Ad will apear here
Next
मनाची शक्ती कशी वापराल
‘तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात, ज्या गोष्टी तुम्हाला मिळतील असा तुमचा विश्वास असतो,’ असा संदेश देणारे हे मनोज अंबिके यांचे हे पुस्तक मनाचे कार्य, मनःशक्तीचा योग्य वापर आदींसंदर्भात मार्गदर्शन करते.

मन कुठे असतं?, माझे मन कसं काम करतं?, दिसतं तसं नसतं, अशी जन्म घेते इच्छाशक्ती, जसा विश्वास तसेच फळ, पण परंतुची जादू, आकर्षणाचा नियम, मनाचे प्रोग्रॅमिंग, स्वयंसूचना-विचारशक्ती, मनाची शक्ती कशी वापरावी? आणि प्रतिक्रिया हेच प्रोग्रॅमिंग अशा ११ प्रकरणांमधून हा विषय स्पष्ट करण्यात आला आहे.

मनाची शक्ती जाणण्यासाठी तीन रहस्ये पुस्तकात दिली आहेत. शक्तीचा योग्य दिशेने कसा वापर करायचा, यासाठी सात सिद्धांत आहेत, तर ११ नियम आहेत. मनाच्या शक्तीचे नियम पाळलेत, तर हवे ते प्राप्त होईल, असे लेखक सांगतात.

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पाने : १५२
किंमत : १५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZYVBI
Similar Posts
मुलांसाठी १०१ प्रभावी सवयी मुलांना चांगल्या सवयी लावल्या, तर त्यांचे आयुष्य घडते. चुकीच्या सवयींमुळे आयुष्य बिघडू शकते. म्हणून चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवणे व चुकीच्या घालवणे हे महत्त्वाचे असते. ते कसे साध्य करता येईल, याबाबत मनोज अंबिके यांनी ‘मुलांसाठी १०१ प्रभावी सवयीं’मधून मार्गदर्शन केले आहे. यातील १०१ सवयींविषयी बोलताना प्रत्येक सवय कशी लावावी, हेही सांगितले
मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती विद्यार्थी दशा ही संपूर्ण आयुष्याचा पाया समजली जाते. या काळात मुलांची जडणघडण होत असते. त्यामुळे या वयात मुलांची बुद्धिमत्ता विकसित झाली, तर आयुष्याचा पाया मजबूत होऊ शकतो. मनोज अंबिके यांनी बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती या पुस्तकात सांगितल्या आहेत. मुलांच्या मेंदूचा संपूर्ण विकास, हायपर मुलांच्या
ध्येयप्राप्तीचे इंगित सांगणारे पुस्तक कुठलंही ध्येय ठरवताना हा विचार करणं आवश्यक आहे, की ‘मी हे ध्येय का निवडतोय? हे ध्येय पूर्ण करण्यासाठी कुठले कुठले मार्ग आहेत? आणि त्या मार्गावरून चालण्यासाठी माझ्याकडे काय काय शस्त्रं आहेत, माझी बलस्थानं काय आहेत?’ - या तीन गोष्टींचा विचार करून आपण कामाला लागलो, तर अशक्यप्राय असं काही नसतं आणि ध्येयपूर्तीचा आनंद नक्की मिळतो
‘स्लमडॉग सीए’च्या जिद्दीची गोष्ट झोपडपट्टीत राहून, समाजाची उपेक्षा आणि तिरस्कार झेलून, अनेक हालअपेष्टांना तोंड देत, परिस्थितीशी दोन हात करत एक निरागस मुलगा एका ध्येयानं झपाटतो... सीए होतो आणि आपल्या प्रतिकूल वाटेवरचा संघर्ष इतरांना करायला लागू नये, म्हणून त्यांना मदतीचा हात पुढे करतो, त्याची ही गोष्ट!... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ सदरात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language